हॅन्डमेड मसाले मध्ये आपले स्वागत आहे

भारतामध्ये मसाल्यांचा दीर्घ आणि प्राचीन इतिहास आहे, आणि ते भारतीय जीवनाचा आणि परंपरेचा महत्वाचा भाग आहेत. प्रत्येक घरामध्ये आणि देशभरातील प्रत्येक प्रांतात, स्वयंपाक करताना वेगवेगळे मसाले आणि मिश्रण वापरून स्वयंपाकात वेगळी आणि विशिष्ट चव निर्माण केली जाते. दैनंदिन स्वयंपाकामध्ये मसाल्यांचा वापर त्यामधील औषधी गुणधर्मांमुळे म्हणून देखील करण्यात येतो. भारतात गृहिणी त्यांचे मसाले घरीच हाताने दळत आणि स्वयंपाकात वापरण्यासाठी स्वतःचे मिश्रण बनवत. जसजशी वर्ष उलटली तसतसे हाताने बनवलेली चव फारच दुर्मिळ झाली. ती चव पुन्हा एकदा आणण्यासाठी 'संत कृपा महिला उद्योग' ने ब्रँड हॅण्डमेड मसाले अंतर्गत हाताने बनवलेले मसाले, लोणचे, चटण्या आणि बरेच काही ही संकल्पना साकार केली.

संत कृपा महिला गृह उद्योग येथे आम्ही सर्व काही पारंपरिक पद्धतीने हाताने बनवतो, त्यात कोणतेही रासायनिक द्रव्य तसेच कोणत्याही प्रकारचे प्रायोगिक रंग न वापरता प्रत्येक पदार्थ चविष्ठ बनवतो. आम्ही १९९९ पासून मसाल्याच्या निमिर्तीत आहोत. आजवरच्या आमच्या प्रवासात आम्ही मसाले, लोणची चटण्या, लाडू, मध, घाण्यावरील तेलं, वाळवणीचे पदार्थ, सर्व प्रकारची पीठे ग्राहकांसाठी तयार करीत आहोत. आज आमची महाराष्ट्रात ८० हून अधिक केंद्रे असून आणि २ भव्य उत्पादन दर्शित दुकाने आहेत. हँडमेड मसाले हा महाराष्ट्रातील लोकांच्या आवडीचा एक प्रसिद्ध ब्रँड बनत आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया

जीभेवर रेंगाळत राहणारी अस्सल देशी गावरान चव
डंकावर कुटलेले हॅन्डमेड मसाले, माठातील गावरान लोणची, उखळावर कुटलेल्या चटण्या